पर्थ : कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमने मंगळवारी वाका मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कमाल केली जी यापूर्वीच्या भारतीय कर्णधारांना ऑस्ट्रेलियात करता आली नव्हती.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी गावसकर, कपिल, अजहर, सचिन, सौरव, द्रविड आणि कुंबळेसारख्या दिग्गजांच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने ऑस्ट्रेलियात यापूर्वी इतकी मोठी धावसंख्या रचली नव्हती. मात्र धोनी सेनेने हे करुन दाखवले.
भारताने पहिल्या वऩडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ३०९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातील भारताची आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी २००४ मध्ये ब्रिस्बेनमध्ये भारताने ३०३ धावा केल्या होत्या. त्यानंतर २००८ मध्ये २९९ धावा केल्या होत्या.