निराश स्क्वॅश खेळाडूनं सोशल मीडियावर आपली किडनी विकायला काढली!

खेळ जगताला हादरवून टाकणारी एक घटना उत्तरप्रदेशच्या बिजनौरमध्ये घडलीय. स्क्वॅश खेळाडू रवी दीक्षित यानं सोशल मीडियावर आपल्या किडनीची बोली लावलीय.

Updated: Jan 12, 2016, 02:38 PM IST
निराश स्क्वॅश खेळाडूनं सोशल मीडियावर आपली किडनी विकायला काढली! title=

बिजनौर : खेळ जगताला हादरवून टाकणारी एक घटना उत्तरप्रदेशच्या बिजनौरमध्ये घडलीय. स्क्वॅश खेळाडू रवी दीक्षित यानं सोशल मीडियावर आपल्या किडनीची बोली लावलीय.

साऊथ एशियन गेम्समध्ये अजूनही कोणताही स्पॉन्सर मिळाला नसल्यानं रवीनं हे पाऊल उचललंय. अवघ्या आठ लाखांत आपली किडनी त्यानं विकायला काढलीय.  

खर्च न झेपणारा... 
येत्या महिन्यात गुवाहाटीमध्ये होणाऱ्या साऊथ एशियन गेम्समध्ये सिलेक्शन झालेल्या चार खेळाडुंपैंकी रवी एक आहे. परंतु, त्याला अजून कोणताही स्पॉन्सर मिळालेला नाही. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्यानं त्याच्या कुटुंबाला हा खर्च पेलवणारा नाही.  

 

सोशल वेबसाईटवर बोली
आपल्या खेळावर यामुळे परिणाम होतोय, हे जाणवल्यानंतर अखेर निराश होऊन रवीनं फेसबुक आणि ट्विटरवर आपल्या किडनीची बोली लावलीय. किडनी विकून आपण या खेळाशिवाय संपूर्ण वर्षभर होणाऱ्या खेळांमध्ये सहभागी होऊ शकतो, असंही रवीनं म्हटलंय. 

 

रवीच्या खेळाचा आलेख

- रवी गेल्या १० वर्षांपासून स्क्वॅश खेळतोय

- २०१० मध्ये त्यानं एशियन ज्युनिअर चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं

- रवीचे पिता धामपूर साखर कारखान्यात चौथ्या श्रेणीत काम करतात. 

- खेळांमध्ये जिंकलेल्या पैंशांतून आत्तापर्यंत रवीनं आपल्या खेळाची तयारी केलीय. 

- वर्ल्ड रँकिंगमध्ये रवी १२६ व्या स्थानावर आहे. 

- २००९ आणि २०१० मध्ये अंडर-१९ मध्ये मलेशियन ज्युनिअर ओपन खिताब त्यानं आपल्या नावावर केला होता. इथवर पोहचणारा रवी देशातला पहिला खेळाडू ठरला होता.