इंदूरमध्ये टीम इंडियाची विजयदशमी

टीम इंडियाने न्यूझीलंडला 321 रन्सनी धूळ चारत व्हाईटवॉश दिला आहे. मॅचमध्ये 13 विकेट्स घेणाऱ्या अश्विनच्या फिरकीपुढे किवींनी सपशेल शरणागती पत्करली. 

Updated: Oct 11, 2016, 05:26 PM IST
इंदूरमध्ये टीम इंडियाची विजयदशमी title=

इंदूर : टीम इंडियाने न्यूझीलंडला 321 रन्सनी धूळ चारत व्हाईटवॉश दिला आहे. मॅचमध्ये 13 विकेट्स घेणाऱ्या अश्विनच्या फिरकीपुढे किवींनी सपशेल शरणागती पत्करली. 

टीम इंडियानं इंदूर टेस्ट जिंकत विजयाचं सोनं लुटलं. भारताने किवींचा 321 रन्सने पराभव केला. किवींची टीम दुस-या इनिंगमध्ये 153 रन्सवर ऑल आऊट झाली. या विजयासह भारतीय टीमनं तीन टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये न्यूझीलंडचा 3-0 नं धुव्वा उडवला.

भारतीय स्पिनर्ससमोर किवी बॅट्समन तग धरु शकले नाही. चेतेश्वर पुजारच्या सेंच्युरीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 475 रन्सचं डोंगराएवढ आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पार करताना किवी बॅट्समनची चांगलीच दाणादाण उडाली. आणि टीम इंडियानं दस-याच्या दिवशी भारतीय क्रिकेट चाहत्यांना विजयाची भेट दिली. कॅप्टन विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, आर. अश्विन आणि रविंद्र जाडेजा भारताच्या विजयाचे हिरो ठरले.