नवी दिल्ली : सुरेश रैनाला प्रियंका चौधरीनं क्लीन बोल्ड केलं. प्रियंका रैनाची लहानपणीची मैत्रीण आहे... आणि तिच्याबरोबर तो लग्नाच्या बेडित अडकणार आहे. आज दिल्लीमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याचा आणि प्रियंकाचा विवाह होणार आहे.
सुरेश रैना आणि प्रियंका चौधरी यांच्या विवाहाच्या चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरु होत्या. बालपणीची मैत्रिण प्रियांका आणि रैनाच्या विवाहाबबात चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. आता, हे दोघे जण विवाह बंधनात अडकतायत.
प्रियंका मूळची गाझियाबादचीच... रैनाच्या आईच्या मैत्रिणीची ती मुलगी... आयटीमध्ये तिनं आपलं करिअर केलंय. नेदलँड्समधील ऍम्सटरडॅमध्ये ती एका बँकेत काम करते. भारतीय टीम मॅच खेळण्यासाठी दौऱ्यावर जात असते अशाच एका वेळीच रैना आणि प्रियंकाची ओळख बंगळुरुमध्ये झाली.
हे 'अरेंज्ड मॅरेज' असलं तरी या भेटी दरम्यानच रैना प्रियंकाच्या प्रेमात पडला होता. आता या 'फेअरी टेल लव्ह स्टोरी'चं ड्रीम वेडिंगमध्ये रुपांतर होतंय. दिल्लीमधील फाईव्ह स्टार हॉटेल लीलामध्ये या दोघांचं विवाह होणार आहे.
यावेळी भारतीय क्रिकेटपटूंबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही त्याच्या लग्नाचं आमंत्रण आहे. अतिशय लो प्रोफाईल असलेली प्रियांका रैनाच्या मॅचेस आवर्जुन बघते.
चेन्नई सुपरकिंग्जच्या आयपीएलच्या अभियानाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यावेळी प्रियांकाचं क्रिकेटप्रेम क्रिकेटप्रेमींना निश्चितच पाहायला मिळेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.