रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेच्या साक्षीनं निवडला आपला जोडीदार...

रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देणारी रेसलर साक्षी मलिक लवकरच विवाहबंधनात अडकणार असं दिसतंय. 

Updated: Sep 6, 2016, 04:35 PM IST
रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेच्या साक्षीनं निवडला आपला जोडीदार...  title=

नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देणारी रेसलर साक्षी मलिक लवकरच विवाहबंधनात अडकणार असं दिसतंय. 

'इंडिया टुडे'च्या महितीनुसार, साक्षीनं मल्ल सत्यव्रत कादियान याच्याशी विवाहाचा निर्णय घेतलाय. सत्यव्रत साक्षीहून एका वर्षानं लहान आहे. 

23 वर्षांचा सत्यव्रत हरियाणाच्या रोहतकमध्ये आखाडा चालवणाऱ्या मल्ल सत्यवान यांचा मुलगा आहे. सत्यवान हे साक्षीचे रेसलिंग गुरू आहेत. 

साक्षीच्या भावानं दिलेल्या माहितीनुसार, साक्षीनं तिच्या विवाहाचा निर्णय रिओ ऑलिम्पिकपूर्वीच घेतला होता.