दुबई : आयसीसीकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. वर्ल्डकपसाठी सचिन तेंडुलकरची ही नियुक्ती असल्याचं बोललं जात आहे. सचिनची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपसाठी ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
आयसीसीने म्हटले आहे, की भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर याची 2015 मध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी ऍम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याने 2011 मध्ये झालेल्या वर्ल्डकपसाठी आपली भूमिका व्यवस्थित पार पडली होती.
सचिन या भूमिकेत वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेशी निगडीत सर्व कार्यक्रमांची प्रसिद्धी करणार आहे. पुढील वर्षी 14 फेब्रुवारी ते 29 मार्च दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होणार आहे.
ऍम्बेसिडर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सचिन म्हणाला, की सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपसाठी ऍम्बेसिडर म्हणून निवड केल्याने मी खूप आनंदी आहे. गेल्या सहा विश्वकरंडक स्पर्धांत खेळल्यानंतर, यावेळी मला वेगळी भूमिका पार पाडावी लागणार आहे.
मी 1987 च्या वर्ल्डकपसाठी बॉल बॉय म्हणून काम केले होते. तेव्हा मी प्रत्येक चेंडूला खेळाडूंना प्रोत्साहन देत असे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये क्रिकेटबद्दल वातावरण चांगले असून, यंदाची स्पर्धा खूप आनंददायक असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.