भारताच्या फलंदाजीत सुधारणा : कॅप्टन धोनी

टीम इंडियाचा कर्णधार कॅप्टन धोनी याने टीम इंडियाच्या फलंदाजीत सुधारणा झाली असल्याचं म्हटलं आहे. 

Updated: Dec 22, 2014, 06:13 PM IST
भारताच्या फलंदाजीत सुधारणा : कॅप्टन धोनी title=

सिडनी : टीम इंडियाचा कर्णधार कॅप्टन धोनी याने टीम इंडियाच्या फलंदाजीत सुधारणा झाली असल्याचं म्हटलं आहे. 

 वर्षभरात परदेशी खेळपट्टयांवर खेळताना टीम इंडियाच्या फलंदाजीत सुधारणा झाली आहे, असे मत भारताचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केले आहे.

ऑस्ट्रेलिया विरुध्द सुरु असलेल्या कसोटी मालिकेत पहिले दोन्ही कसोटी सामने भारताने गमावले असले तरी, गेल्या वर्षभरात परदेशी खेळपट्टयांवर खेळताना भारतीय संघाच्या फलंदाजीत सुधारणा झाली आहे, असे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंह ढोणीने व्यक्त केले आहे.

ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या पहिल्या आणि दुस-या कसोटी सामन्यात मोक्याच्या क्षणी भारतीय फलंदाज ढेपाळल्याने मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० ने आघाडी घेतली. भारताने कसोटी सामने गमावले असले तरी, मागच्या वर्षभरात परदेश दौ-यांमध्ये भारतीय संघाच्या फलंदाजीत सुधारणा झाली आहे.

या कामगिरीमध्ये अधिक सुधारणा केली पाहिजे असे ढोणीने म्हटले आहे. खेळाडूंना जो अनुभव मिळतोय तो महत्वाचा आहे. अनुभवाला कुठलाही पर्याय नाही. 

आम्हाला अनुभवी खेळाडू दुसरीकडून कुठून मिळणार नाहीत. याच खेळाडूंना अधिकाधिक सामने खेळावे लागतील त्यातून त्यांना अनुभव येईल. आम्ही जेवढे जास्त परदेशात खेळू तितकी आमच्या अनुभवात भर पडेल असे ढोणीने म्हटले आहे.

ब्रिस्बेन कसोटीतील पराभव भारताचा सलग पाचवा पराभव ठरला. यापूर्वी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका दौ-यात भारताने कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्ला. यावेळच्या ऑस्ट्रेलिया दौ-यात भारतीय संघ पराभूत होत असला तरी, एखाद्या सत्राचा अपवाद वगळता भारताच्या फलंदाजीत कमालीची सुधारणा दिसून येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.