आश्विनची भूमिका महत्त्वाची : सौरव गांगुली

 भारताच्या यशात आश्विनची कामगिरी मोलाची असेल, वेस्टइंडिज दौऱ्यावर भारताचा फिरकीपटू आर. आश्विन हा महत्त्वाची भूमिका  पार पाडणार, असं  टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलंय़.

Updated: Jul 9, 2016, 05:05 PM IST
आश्विनची भूमिका महत्त्वाची  : सौरव गांगुली title=

कोलकाता :  भारताच्या यशात आश्विनची कामगिरी मोलाची असेल, वेस्टइंडिज दौऱ्यावर भारताचा फिरकीपटू आर. आश्विन हा महत्त्वाची भूमिका  पार पाडणार, असं  टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलंय़.

कोच अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया पहिल्यांदा खेळणार आहे.  टीम इंडिया ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्टइंडिज दौऱ्यावर गेला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात आश्विनसह अमित मिश्रा, रवींद्र जडेजा या फिरकीपटूंचा समावेश आहे. 

वेस्टइंडिजचा संघ मजबूत आणि चांगली कामगिरी करत असला तरी, मला वाटतेय की टीम इंडिया विजयी ठरेल, असं गांगुली म्हणाला. 

टीम इंडियात त्यांना पराभूत करण्याची क्षमता आहे. विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. फिरकीपटू आश्विनची भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका असेल, असंही यावेळी गांगुलीने सांगितलं.