मिरपूर : भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भले नाबाद ७ धावांची खेळी केली असेल मात्र त्यानंतरही त्याने नवा रेकॉर्ड बनवलाय. हा विक्रम कदाचित कोणी मोडू शकेल.
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधाराच्या रुपायत २०० षटकार मारण्याचा रेकॉर्ड केलाय. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात धोनीने नाबाद ७ धावा केल्या. मिलिंदा सिरिवर्दनेच्या चेंडूवर षटकार लगावताना धोनीने हा रेकॉर्ड केला. त्याचा हा रेकॉर्ड भविष्यात कदाचित कोणी मोडू शकेल.
या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर रिकी पॉटिंग १७१ षटकारांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅकक्युलम १७० षटकांसह तिसऱ्या स्थानी आहे. हे दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेत. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल १३४ षटकारांसह चौथ्या स्थानी आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली या यादीत १३२ षटकारांसह पाचव्या स्थानी आहे.