मुंबई : विराट कोहली आणि युवराज सिंहच्या जबरदस्त खेळीनं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताला विजय मिळाला. या विजयातला 'कुलेस्ट प्लेअर' ठरलेल्या युवीवर त्याची प्रेयसी हेझल यामुळचे जाम खुश आहे.
मंगळवारी रात्री १८ बॉल्समध्ये ३५ रन्स ठोकणाऱ्या युवीला मॅचचा कुलेस्ट प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब मिळाला. यासाठीच त्याला बक्षीस म्हणून २५०० डॉलर म्हणजेच जवळपास १ लाख ७० हजार रुपये मिळाले आहेत.
हा खिताब मिळाल्यानंतर युवीला त्याची होणारी पत्नी हेझल हिनं एक गोड मॅसेज पाठवलाय. सोशल मीडियावर हेझलनं युवीचं कौतुक करण्यासोबतच एक मागणीही त्याच्याकडे केलीय.
Coolest player @yuvstrong12 (take me shopping with your winnings ) very nicely done… https://t.co/A2WXrYDhy8
— Hazel Keech (@hazelkeech) March 1, 2016
'कुलेस्ट प्लेअर युवराज (जिंकलेल्या रकमेतून मला शॉपिंगला घेऊन चल) चांगलं खेळलास...' असं हेझलनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटलंय... आणि युवीनंही आपल्या प्रेयसीची मागणी रिट्विट केलीय.