आयपीएलच्या इतिहासात वॉर्नरने केल्या जलद ४००० धावा

आयपीएलच्या १०व्या हंगामातील आजच्या सामन्यात कोलकाताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करताना हैदराबादला २० षटकांत १२८ धावांवर रोखले. 

Updated: May 17, 2017, 10:55 PM IST
आयपीएलच्या इतिहासात वॉर्नरने केल्या जलद ४००० धावा title=

बंगळूरु : आयपीएलच्या १०व्या हंगामातील आजच्या सामन्यात कोलकाताने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करताना हैदराबादला २० षटकांत १२८ धावांवर रोखले. 

या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरची बॅट जरी तळपली नसली त्याने नवा रेकॉर्ड केलाय. वॉर्नरने आयपीएलच्या इतिहासात जलद ४००० धावा करण्याचा विक्रम केलाय.

आयपीएलमध्ये जलद ४००० धावा पूर्ण करणारा तो पहिला विदेशी क्रिकेटपटू आणि पाचवा क्रिकेटपटू ठरलाय. ११४ डावांत त्याने इतक्या धावा पूर्ण केल्या. सर्वात कमी डावांत ४००० धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर होता. त्याने १२८ डावांत या धावा पूर्ण केल्या होत्या. वॉर्नरवगळता एकाही विदेशी क्रिकेटपटूला हा रेकॉर्ड करता आलेला नाहीये.