पुण्याविरुद्धच्या पराभवानंतरही मुंबई अव्वल

वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्र डर्बीमध्ये पुण्याविरुद्ध मुंबईचा पुन्हा पराभव झाला असला तरी पॉईंट टेबलमध्ये मात्र मुंबईने अव्वल स्थान कायम राखलेय.

Updated: Apr 24, 2017, 11:56 PM IST
पुण्याविरुद्धच्या पराभवानंतरही मुंबई अव्वल title=

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्र डर्बीमध्ये पुण्याविरुद्ध मुंबईचा पुन्हा पराभव झाला असला तरी पॉईंट टेबलमध्ये मात्र मुंबईने अव्वल स्थान कायम राखलेय.

८ सामन्यांपैकी ६ सामन्यांमध्ये मुंबईने विजय मिळवला. विशेष म्हणजे उरलेल्या दोन्ही सामन्यात मुंबईला पुण्याकडूनच पराभव पत्करावा लागलाय. मुंबई १२ पॉईंटसह पहिल्या स्थानी आहे. तर कोलकाता दुसऱ्या स्थानी आहे. त्यांचे १० पॉईंट झालेत.

हैदराबाद(८ पॉईंट) तिसऱ्या, पुणे(८ पॉईंट) चौथ्या, पंजाब(६ पॉईंट) पाचव्या, दिल्ली(४ पॉईंट) सहाव्या, गुजरात(४ पॉईंट) सातव्या आणि बंगळूरु ४ गुणांसह सगळ्यात तळाच्या स्थानी आहे.

(ही आकडेवारी मुंबई-पुणे सामन्यापर्यंतची आहे)