वरूण एरॉनच्या नेतृत्वात खेळणार धोनी

जगभरातील क्रिकेट रसिकांनी कॅप्टन कूल अशी पदवी दिलेला भारताचा वन डे आणि टी-२० चा कर्णधार एमएस धोनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंडकडून खेळणार आहे. पण घरगुती मॅच खेळताना तो संघाचे नेतृत्व करणार नाही. 

Updated: Dec 7, 2015, 10:36 PM IST
वरूण एरॉनच्या नेतृत्वात खेळणार धोनी title=

नवी दिल्ली : जगभरातील क्रिकेट रसिकांनी कॅप्टन कूल अशी पदवी दिलेला भारताचा वन डे आणि टी-२० चा कर्णधार एमएस धोनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंडकडून खेळणार आहे. पण घरगुती मॅच खेळताना तो संघाचे नेतृत्व करणार नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार,  झारखंड क्रिकेट असोशिएशनचे प्रमुख अमिताभ चौधरी यांनी घरगुती स्पर्धेसाठी धोनीला कर्णधारपदाची ऑफर दिली होती. पण त्याने नकार दिला. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार एमएस धोनी स्पर्धेत वरूण एरॉनच्या नेतृत्त्वात झारखंडच्या संघाकडून खेळणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.