आयसीसी रँकिगमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर

दक्षिण आफ्रिकेला 4 पैकी 3 मॅचमध्ये पराभवाची धुळ चारणारा भारतीय संघ आयसीसी टेस्ट रँकिगमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

Updated: Dec 7, 2015, 07:34 PM IST
आयसीसी रँकिगमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर title=

दुबई : दक्षिण आफ्रिकेला 4 पैकी 3 मॅचमध्ये पराभवाची धुळ चारणारा भारतीय संघ आयसीसी टेस्ट रँकिगमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

भारताने शेवटच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेवर  ३३७ रन्ससे मोठा विजय मिळवत 10 गुण मिळवले. भारताचे गुण आता १०० वरून ११० अंक झाले आहेत. सिरीज जिकल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. 

भारताला आता 1 एप्रिलपर्यंत या वर्षातील कोणतीही टेस्ट मॅच खेळता येणार नाही. त्यामुळे इतर संघांना आयसीसी रँकिगमध्ये पुढे जाण्यासाठी संधी आहे. 

ऑस्ट्रेलिया 10 डिसेंबरपासून 3 सामन्यांसाठी आठव्या क्रमांकावर असणाऱ्या वेस्ट विंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने जर ही सिरीज 3-0 ने जिंकली तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर झेप घेऊ शकतो. पण त्यासाठी इंग्लडने 26 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरोधातील सिरीजमध्ये जिंकणं आवश्यक आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.