शेवटच्या बॉलवर मुस्ताफिजूरला रन आऊट करत कॅप्टन कूल धोनी म्हणाला, बुरा न मानो होली है...

 शेवटच्या बॉलवर मुस्ताफिजूर रन आऊट करत कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी म्हणाला, बुरा न मानो होली है... 

Updated: Mar 24, 2016, 11:36 AM IST
शेवटच्या बॉलवर मुस्ताफिजूरला रन आऊट करत कॅप्टन कूल धोनी म्हणाला, बुरा न मानो होली है... title=

बंगळुरु : टीम इंडियाने बांग्लाला धूळ चारत १ रन्सने सामना जिंकल्याने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शेवटच्या बॉलवर मुस्ताफिजूर रन आऊट करत कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी म्हणाला, बुरा न मानो होली है... 

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-बांग्लादेश यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. टीम इंडियाने १ रन्सने हा सामना जिंकला आणि आनंदाला पारावार उरला नाही. अनेकांनी हार्दिक पांड्या आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे कौतुक करत शुभेच्छांचा वर्षावर केला. धोनीने खऱ्या अर्थाने धुळवड साजरी केली, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.  

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील आतापर्यंतचा सर्वात रोमहर्षक सामना आणि विजय आहे. हा सामना धोनीने आपल्या बुद्धिमत्तेच्या विजयावर जिंकला. मुस्ताफिजूर रहमनानला शेवटच्या बॉलवर जोरदार पळून रनआऊट केले आणि धोनी म्हणाला, बुरान मानो होली है.... शेवटा बॉलवर मॅचचा निर्णय झाला. बांग्लादेशला जिंकण्यासाठी २ आणि सामना टाय करण्यासाठी १ रन्सची गरज होती.

कॅप्टन धोनीने चलाखीने हार्दिक पांड्याला शेवटची ओव्हर दिली. पांड्या आणि धोनीला माहित होते की बांग्लादेशची जोडी शुवागता आणि मुस्ताफिजूर कसेही करुन एक रन्स घेणार आणि मॅचला 'सुपर ओव्हर'मध्ये ढकलणार.

हार्दिकने नेहराशी चर्चा केली आणि त्यानंतर नेहरा आणि धोनी यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर रणनीती आखण्यात आली. शेवटच्या बॉलच्यावेळी धोनीने उजव्या हातातील ग्लोज काढला. त्यामुळे रन आऊट करण्यासाठी कोणतीही समस्या येणार नाही. हार्दिक पांड्याने बॉल टाकला आणि नॉन स्ट्राईक एंड योजनेनुसार मुस्ताफिजूर रहमान धावले.

धोनीने १०० मीटर पळत आणि काही सेकंदात रहमानला रनआऊट केले. यासाठी पंचानी तिसऱ्या अंपायरची मदत घेतली. त्यानंतर पूर्ण मैदानात शांतता पसरली. रिप्ले बघण्यासाठी टीव्ही स्क्रीनकडे डोळे लागले. रनआऊट घोषित झाल्यानंतर टीम इंडियाचा जल्लोष सुरु झाला. बुरा न मानो होली है....