विराट कोहली क्रिस गेलच्या रेकॉर्डचा केला चक्काचूर

रॉयल बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहली सध्या फॉर्मात आहे. आपल्याच संघात असलेल्या क्रिस गेलचा आयपीएल सीझनमध्ये सर्वात जास्त रन्स बनवण्याचाही रेकॉर्ड त्यानं मोडीत काढलाय. 

Updated: May 17, 2016, 08:34 AM IST
विराट कोहली क्रिस गेलच्या रेकॉर्डचा केला चक्काचूर title=

कोलकाता : रॉयल बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहली सध्या फॉर्मात आहे. आपल्याच संघात असलेल्या क्रिस गेलचा आयपीएल सीझनमध्ये सर्वात जास्त रन्स बनवण्याचाही रेकॉर्ड त्यानं मोडीत काढलाय. 

आयपीएल २०१६ च्या ४८ व्या मॅचमध्ये कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये विराटनं हा विक्रम रचलाय. 

क्रिस गेलनं आयपीएल २०१२ मध्ये १४ खेळींमध्ये ७३३ रन्स बनवले होते. परंतु, चेन्नई सुपर किंग्जच्या मायकल हसीनं या रेकॉर्डची पुढच्याच वर्षी बरोबरी करून दाखवली होती. परंतु, यासाठी मायकलला क्रिस गेलहून तीन खेळी जास्त खेळाव्या लागल्या होत्या. 

परंतु, यंदाच्या सीझनमध्ये मात्र विराटनं केवळ १२ खेळींमध्ये हा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवलाय. या आयपीएल सीझनमध्ये कोहलीनं क्रमश: ७५, ७९, ३३, ८०, १००, १४, ५२, १०८, २०, ७, १०९ आणि ७५ रन्स बनवले. १२ मॅचनंतर कोहलीच्या खात्यात ७५२ रन्स जमा झालेत.