भारताचा आज इंग्लंडशी सामना

भारताच्या महिला क्रिकेट संघाकडे आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्याची संधी आहे. आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये भारताला एक विजय मिळाला तर एका पराभवाचा सामना करावा लागलाय. 

Updated: Mar 22, 2016, 10:17 AM IST
भारताचा आज इंग्लंडशी सामना title=

धरमशाला : भारताच्या महिला क्रिकेट संघाकडे आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्याची संधी आहे. आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये भारताला एक विजय मिळाला तर एका पराभवाचा सामना करावा लागलाय. 

भारतीय महिला संघाचा आज इंग्लंडविरुद्ध सामना होतोय. हा सामना भारताच्या महिला संघाने जिंकल्यास त्यांना सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी आहे. बांगलादेशविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. 

त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पावसाने हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेतला होता. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात आले होते.