'पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेवटपर्यंत खेळता आले नाही'

कोलकाताच्या इडन गार्डनवर पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात भारताने सहा विकेट राखून दमदार विजय मिळवला. 

Updated: Mar 22, 2016, 08:46 AM IST
'पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेवटपर्यंत खेळता आले नाही' title=

कोलकाता : कोलकाताच्या इडन गार्डनवर पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात भारताने सहा विकेट राखून दमदार विजय मिळवला. या विजयाचे श्रेय कोहलीसोबत युवराज सिंगलाही तितकेच द्यावे लागेल. भारताची बिकट अवस्था असताना विराट आणि युवराज यांनी खेळपट्टीवर टिकून राहताना भारताला विजय मिळवून दिला. मात्र विजय मिळवल्यानंतर युवराजच्या मनात एक खंत आहे. 

या सामन्यात युवराजने २४ धावांची खेळी केली. मवा परिस्थितीनुसार फलंदाजी करायची होती. योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. चेंडूवर लक्ष देत स्ट्राईक फिरता ठेवण्याचा माझा विचार होता आणि यात मी सफल झालो. मात्र माझे दुर्भाग्य असे की सामना संपवू शकलो नाही. विराट चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि धोनीने येऊन सामना संपवला, असे युवराजने सांगितले. 

पुढे तो असंही म्हणाला, माझे काम काही चेंडू खेळून नंतर शॉट खेळणे होते. पहिला सामना गमावल्यानंतर आम्ही थोडे दबावात होतो. त्या सामन्यात आमची फलंदाजी चांगली होऊ शकली नाही. या सामन्यातही आम्ही सुरुवातीला तीन फलंदाज झटपट गमावले ज्यामुळे आमच्यावर दबाव आला. यावेळी योग्य भागीदारीची आवश्यकता होती. विराटसोबतच्या अर्धशतकी भागीदारीमुळे हा दबाव कमी झाला. 

विराटसोबत युवराजही चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि फॉर्ममुळे खुद्द युवराजही खुश आहे. बांगलादेशविरुद्धच्या पुढील सामन्यात हाच फॉर्म कायम ठेवण्याचा युवराजचा प्रयत्न असेल.