विराट कोहलीचं नेतृत्व आक्रमक असेल - जॉन्सन

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल जॉन्सन यानं विराट कोहली एक कॅप्टन म्हणून उत्कृष्ट कामगिरी करू शकेल, असा विश्वास व्यक्त केलाय. भारताचा नवा टेस्ट कॅप्टन विराट कोहलीचा समोरासमोर आणि थेट प्रत्यूत्तर देऊन भिडण्याच्या स्वभावाचा त्याच्या कॅप्टन्सीवर प्रभाव दिसेल. त्यामुळे, टीम इंडियामध्ये आक्रमकता तो आणू शकेल.

Updated: Jan 2, 2015, 05:45 PM IST
विराट कोहलीचं नेतृत्व आक्रमक असेल - जॉन्सन title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल जॉन्सन यानं विराट कोहली एक कॅप्टन म्हणून उत्कृष्ट कामगिरी करू शकेल, असा विश्वास व्यक्त केलाय. भारताचा नवा टेस्ट कॅप्टन विराट कोहलीचा समोरासमोर आणि थेट प्रत्यूत्तर देऊन भिडण्याच्या स्वभावाचा त्याच्या कॅप्टन्सीवर प्रभाव दिसेल. त्यामुळे, टीम इंडियामध्ये आक्रमकता तो आणू शकेल.

सध्या सुरू असलेल्या चार टेस्ट मॅचच्या साखळीतील पहिल्या तीन मॅच दरम्यान अनेक वेळा कोहली आणि जॉनसन एकमेकांशी भिडलेत. ऑस्ट्रेलिया श्रृंखलेच्या पहिल्या दोन मॅच जिंकल्यानंतर तिसरी टेस्ट मॅच ड्ऱॉ झाली होती. त्यामुळे, ऑस्ट्रेलिया ही सीरिज जिंकलीय. 

'मजेशीर म्हणजे, विराट त्याच्या आक्रमक खेळासाठी ओळखला जात नाही. पण मी जेव्हापासून त्याला ओळखतो तेव्हापासून नेहमीच त्याचा आक्रमकपणा पाहिलाय' असं जॉन्सननं म्हटंलय. तो निश्चितच एक आक्रमक कॅप्टन म्हणून समोर येईल. महेंद्रसिंग धोनीच्या तुलनेत कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये बरंच काही वेगळं पाहायला मिळू शकेल. तो खूपच स्ट्राँग प्रतिस्पर्धी आहे... विरोधी कुणीही असो कोहलीच्या अॅटीट्यूडमध्ये काहीही फरक पडत नाही... असं जॉन्सननं म्हटलंय. 

'कोहलीसमोर कोण खेळतंय याने काहीही फरक पडत नाही... तो तुम्हाला समोरून प्रत्यूत्तर देतो आणि त्याला याच पद्धतीनं खेळणं आवडतं. विराट केवळ आम्हाला इतकंच सांगत होता की त्यानं किती रन्स बनवलेत आणि आम्ही केवळ पाहत होतो की आम्ही श्रृंखला २-० अशा फरकानं पुढे आहोत... तो नेहमीच एका खेळाचा समान हिस्सा आहे आणि राहील' असंही जॉन्सननं म्हटलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.