मास्टर-ब्लास्टर जेव्हा बनतो 'मास्टरशेफ'...!

 मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर फावल्या वेळात काय करत असेल? असा प्रश्न त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना पडतो....

Updated: Jan 1, 2015, 11:10 PM IST


सचिन

मुंबई : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर फावल्या वेळात काय करत असेल? असा प्रश्न त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना पडतो.... तर, या प्रश्नाचं उत्तर खुद्द सचिननंच दिलंय तेही सोशल वेबसाईटवर... 

तसा, सचिन सोशल साईट्सद्वारे कधी-कधी तो काय करत असतो याची माहिती त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असतो. सचिननं नुकताच आपला एका फोटो सोशल वेबसाईट फेसबुकवर अपलोड केलाय. यामध्ये, तो चक्क जेवण बनवताना दिसतोय. 

सुट्टीसाठी सध्या मसूरीत असलेल्या सचिनने आपल्या तब्बल 45 मित्रांसाठी वांग्याचं भरीत बनवलंय आणि हा क्षण त्यानं कॅमेऱ्यात कैदही केलाय. आईने ही रेसेपी आपल्याला शिवकलं असल्याचंही त्यानं फोटोच्या बाजूला नमूद केलंय. या फोटोला आत्तापर्यंत एक लाख 32 हजार लाईक्स मिळाल्या असून 16 हजारांहून अधिक जणांनी ही फोटो शेअर केलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.