लंडन: इंग्लंड विरूध्दच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियानं 95 रन्सनं विजय मिळवत नवा इतिहास रचलायं. तब्बल 28 वर्षांनी टीम इंडियानं लॉर्डसवर विजय मिळवत पाच टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये 1-0 नं आघाडी मिळवलीयं.
लॉर्डस टेस्टमध्ये टीम इंडियानं विजय मिळवत एक नवा अध्याय लिहीलायं... 28 वर्षांनी लॉर्डसवर टीम इंडिया विजयी झाली ती केवळ सांघिक कामगिरीमुळे... शेवटच्या दिवसात भारताला इंग्लंडचे 6 बॅटसमन आऊट करायचे होते, आणि इंग्लंडला विजयासाठी 214 रन्सची आवश्यकता होती... पाचव्या दिवसाच्या सुरूवातीला इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय बॉलर्सला यश मिळू दिलं नाही...
पाचव्या विकेटसाठी जो रूट आणि अलीनं 100 रन्सची दमदार पार्टनरशिप करत भारतीय बॉलर्सला चांगलच झुंजवलं. मात्र त्यानंतर भारतीय बॉलर्सनी आपली स्ट्रॅटेजी बदलत आखूड टप्प्याच्या चेंडूंचा मारा करत इंग्लिंश बॅटसमनला विकेट देण्यास भाग पाडलं. विशेषतः इशांत शर्मानं आक्रमक बॉलिंग करत इंग्लिश बॅटसमनला भंडावून सोडलं. इशांतच्या बॉलिंगचं उत्तर इंग्लिंश बॅटसमनला काही केल्या सापडत नव्हतं. अखेर इशांतच या विजयाचा शिल्पकार ठरला त्यालाच मॅन ऑफ द मॅचनं गौरविण्यात आलं.
मात्र या टेस्टची सुरूवात अतिशय वेगळी झाली होती. पहिल्या दिवाची विकेट पूर्णपणे फास्ट बॉलर्सला सहाय्य करत होती. भारतीय बॅट्समनला इंग्लिश बॉलर्सचा सामना करणं कठीण होऊन बसलं होतं. अशा कठीण काळात टीम इंडियाच्या मदतीला धावून आला अजिंक्य रहाणे... अजिंक्यच्या सेंच्युरीनं टीम इंडिया आव्हानात्मक धावसंख्या ऊभारु शकली. इंग्लंडच्या पहिल्या डावाला खिंडार पाडण्याचं काम केलं भुवनेश्वर कुमारनं... त्य़ानं सहा विकेटस घेत इंग्लंडला 319 धावांवर रोखण्यात मोलाची भूमिका बजावली...
तर भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये मुरली विजय आणि रविंद्र जाडेजा यांनी मोलाची भूमिका बजावली. एकूणच सांघिक कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं हा विजय मिळवत एक नाव अध्याय लिहीलाय आणि या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. आता ही आघाडी वाढविण्यात टीम इंडिया यशस्वी ठरते की इंग्लिश टीम कमबॅक करण्यात यश मिळवते ते पहाणं महत्त्वाच ठरणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.