BCCIची अनुष्काला सोबत न्यायची परवानगी नाही- शुक्ला

 भारताचा क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघं इंग्लंडमध्ये एकत्र असल्याच्या बातमीनंतर आता बीसीसीआयला जाग आलीय आणि त्यांनी म्हटलंय की, या दोघांना बीसीसीआयकडून अशी कोणतीही परवानगी दिली गेलेली नाही.

Updated: Jul 21, 2014, 07:47 PM IST
BCCIची अनुष्काला सोबत न्यायची परवानगी नाही- शुक्ला title=

देहरादून :  भारताचा क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघं इंग्लंडमध्ये एकत्र असल्याच्या बातमीनंतर आता बीसीसीआयला जाग आलीय आणि त्यांनी म्हटलंय की, या दोघांना बीसीसीआयकडून अशी कोणतीही परवानगी दिली गेलेली नाही.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एका हिन्दी वृत्तपत्राला स्पष्ट शब्दात सांगितलं की विराट कोहलीला अनुष्का शर्माला सोबत नेण्याची कोणतीही परवानगी दिलेली नाही. भारतीय टीमच्या इंग्लंड दौऱ्यात कोहलीच्या खराब प्रदर्शनामूळं एकीकडे टीका होत आहे तर दूसरीकडे त्या सतत अनुष्का शर्मा सोबत बघितलं जातंय. दोघांना नॉटिंघमच्या हॅाटेलमधुन एकत्र निघतांनाही बघितलं गेलं आहे. यामुळं त्याच्या खेळावर परिणाम होत असल्याची चर्चा आहे.

शुक्ला यांनी देहरादूनमध्ये पत्रकारांच्या प्रश्नानां उत्तर देतांना म्हटलंय की, खेळाडू सोबत राहण्याचा अधिकार फक्त त्याच्या पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांना आहे. मित्रांना फक्त भेटण्याची परवानगी आहे, पण सोबत राहण्याची नाही. विराट कोहलीला अशी कोणतीही सुट दिलेली नाही.

पण शुक्लांनी हे मान्य करण्यास नकार दिला की यामुळं विराटच्या फॉर्मवर फरक पडला आहे. त्यांनी असंही म्हटलं की एक-दोन मॅचमध्ये खराब प्रदर्शनानं टीका नाही केली जाऊ शकत. सीरिज संपल्यानंतरच यावर बोलता येऊ शकतं. बीसीसीआयच्या या विधानानंतर आता या विवादावर पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.