युवराजच्या दीडशतकी खेळीनंतर हेझलचा मेसेज

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दमदार दीडशतक साकारणाऱ्या युवराज सिंगचे चहूबाजूंनी कौतुक होतेय. इतर सर्वांकडून कौतुक होत असताना त्याची पत्नी हेझल कशी मागे राहील.

Updated: Jan 20, 2017, 12:13 PM IST
युवराजच्या दीडशतकी खेळीनंतर हेझलचा मेसेज title=

कटक : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दमदार दीडशतक साकारणाऱ्या युवराज सिंगचे चहूबाजूंनी कौतुक होतेय. इतर सर्वांकडून कौतुक होत असताना त्याची पत्नी हेझल कशी मागे राहील.

युवराजच्या शानदार खेळीनंतर हेझलनेही इन्स्टाग्रामवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या. भयंकर असं युवराजचं मधलं नाव हवं होत. १२७ चेंडूत दीडशे धावा. मॅन ऑफ दी मॅच. भारताची मालिकेत विजयी आघाडी. कॅन्सरवरील उपचारानंतर त्याने केलेल्या दमदार कमबॅकबद्दल हेझलने या पोस्टमध्ये म्हटलंय. 

भारताचा डाव अडचणीत असताना युवराज आणि महेंद्र सिंग धोनीने चांगली खेळी करताना संघाला साडेतीनशे पार धावसंख्या गाठून दिली. यात युवराजने १५० धावा केल्या तर धोनीने १३४ धावांची खेळी साकारली.