पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याला आयसीसीने फटकारले

 भारतीय ऑलराउंडर हार्दिक पांड्याला ऑस्ट्रेलिया विरूद्ध टी-२० सामन्यात विकेट घेतल्यावर आक्रमक अंदाजात आनंद व्यक्त करण्यासाठी आयसीसीने फटकारले आहे. 

Updated: Jan 28, 2016, 09:38 PM IST
 पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याला आयसीसीने फटकारले title=

मेलबर्न :  भारतीय ऑलराउंडर हार्दिक पांड्याला ऑस्ट्रेलिया विरूद्ध टी-२० सामन्यात विकेट घेतल्यावर आक्रमक अंदाजात आनंद व्यक्त करण्यासाठी आयसीसीने फटकारले आहे. 

पंड्याने आपली चूक मान्य केली

ऑस्ट्रेलिया इनिंगच्या १६ व्या ओव्हरमध्ये जेव्हा क्रिस लिनला बाद केल्यानंतर पांड्या फलंदाजकडे आक्रमक अंदाजात आनंद व्यक्त करत गेला. पांड्याने आपली चूक मान्य करत मॅच अधिकारी जेफ क्रो यांनी दिलेल्या शिक्षेचा स्वीकार केला. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही. 

आयसीसीने आचारसंहितेचे केले उल्लंघन 

पांड्याची तक्रार मैदानातील अंपायर सिमो फ्राय आणि जॉन वॉर्ड, तिसरा अंपायर पॉल विल्सन आणि चौथा अधिकारी गेरार्ड एबूड यांनी केली होतीी. पांड्या आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन करताना आढळला. 
फलंदाज बाद झाल्यावर आक्रमक प्रतिक्रिया देण्यासंदर्भात हा नियम आहे. यात कमीत कमी शिक्षा फटकारणे आणि अधिक शिक्षा मॅच फीमधील ५० टक्के कपात करणे ही असते.