नवी दिल्ली : टी-२० वर्ल्डकपमध्ये कोलकाच्या ईडन गार्डनवर पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष देशभरात साजरा करण्यात आला. कोलकातापासून दिल्लीपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात विजय सादरा करण्यात आला.
मात्र काय धोनीची पत्नी या जल्लोषात सामील होती? त्यांच्या ट्विटवरुन तर असे वाटत नाही.
जेव्हा टीम इंडियाचा विजय झाला तेव्हा धोनीच्या घराबाहेरही क्रिकेट चाहत्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. मात्र चाहत्यांच्या या जल्लोषामुळे धोनीची पत्नी साक्षी चांगलीच वैतागली.
साक्षीने टीम इंडियाला शुभेच्छा दिल्याच मात्र असंही लिहिल की त्यांच्या घराबाहेर फटाके फोडले जातायत. मोठ्या आवाजात हॉर्न वाजवले जातायत. तुम्ही माझ्या मुलीला झोपेतून जागे कराल.
Ppl outside my house ...honking burning fire crackers ...screaming ...u guys r gonna wake up my daughter ....
— Sakshi Singh Dhoni (@SaakshiSRawat) March 19, 2016