भारतीय टीव्ही अँकरवर शोएब भडकला

 टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पुन्हा एकदा भारताविरुद्ध पराभव झाला.

Updated: Mar 20, 2016, 09:56 AM IST
भारतीय टीव्ही अँकरवर शोएब भडकला title=

मुंबई: टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पुन्हा एकदा भारताविरुद्ध पराभव झाला. पण हा पराभव पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरच्या चांगलाच जिव्हारी लागला. 

कॉमेंट्रीसाठी भारतात आलेला शोएब अख्तर पाकिस्तानच्या या पराभवानंतर भारताच्या टीव्ही अँकरवरच भडकला. मॅच संपल्यानंतरच्या चर्चा सुरु होताना मौका मौका हे गाणं लागलं, आणि त्यावेळी स्टार स्पोर्ट्सचा अँकर हसला, यावरुन शोएब नाराज झाला. 

सुरवातीला तु हसलास का ? पाकिस्तान टीमची मस्करी करु नको, हे तुझं काम नाही, अशा शब्दांमध्ये शोएबनं या अँकरला सुनावलं. 

जेव्हा शोएब भडकतो, पाहा व्हिडिओ