धोनीने केले युवराजला टीम इंडियातून Out

 टीम इंडियाच्या वर्ल्ड कप स्वॉडची घोषणा मंगळवारी करण्यात आली पण यात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्टार फलंदाज युवराज सिंग याला टीम इंडियात सामील करण्यात आले नाही. काही दिवसांपूर्वी असा अंदाज लावण्यात येत होता की युवराजला रणजीतील कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाच्या अंतीम १५मध्ये जागा मिळू शकते. 

Updated: Jan 6, 2015, 06:53 PM IST
धोनीने केले युवराजला टीम इंडियातून Out title=

मुंबई :  टीम इंडियाच्या वर्ल्ड कप स्वॉडची घोषणा मंगळवारी करण्यात आली पण यात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्टार फलंदाज युवराज सिंग याला टीम इंडियात सामील करण्यात आले नाही. काही दिवसांपूर्वी असा अंदाज लावण्यात येत होता की युवराजला रणजीतील कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाच्या अंतीम १५मध्ये जागा मिळू शकते. 

युवराजने नुकतेच रणजी सामन्यात लागोपाठ तीन शतक लगावून आपली दावेदारी दाखल केली होती. पण त्याला संघात स्थान नाही मिळाले, याच्यामागे कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा असल्याचे सूत्रांनी सांगितले. असे सांगण्यात येत आहे की धोनीला टीममध्ये युवराज नको होता. निवड समितीला धोनीच्या या हट्टापुढे झुकावे लागले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी युवराज सिंगच्या एन्ट्रीला कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने विरोध केला. निवड समिती युवराजला संघात सामील करण्याच्या बाजूने होते. पण टीम मॅनेजमेंट याच्या विरोधात होती. टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर आणि रवि शास्त्री यांना युवराजला संघात घ्यायचे होते. धोनीनुसार युवी स्पिन ऑल राउंडर आहे पण टीमला पेसर ऑलराउंडर पाहिजे आहे. 

निवड समितीच्या या बैठकीत धोनी आणि प्लेचर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. युवराजबाबत बैठकीत लांबलचक चर्चा झाली. शेवटी निवड समितीला युवराज न घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

युवराज सिंगने २०११ वर्ल्ड कप विजयात खूप मोठा वाटा उचलला होता. तो वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून निवडण्यात आला होता. त्याने वर्ल्ड कप मध्ये ११३.६६ च्या सरासरीने ३६२ धावा काढल्या होत्या. यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. युवराजने १५ विकेटही घेतल्या होत्या. युवराजने एकट्याच्या जीवावर अनेक मॅच जिंकून दिल्या होत्या. तसेच एका सामन्यात त्याने पाच विकेट घेऊन ५० दावा काढल्याची कामगिरी केली होती. असा करणारा तो पहिला खेळाडू बनला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.