धोनीची अपयशी झुंझार खेळी

 महेंद्रसिंग धोनीनं 70 रन्सची तडाखेबंद इनिंग खेळल्यानंतरही त्याच्या झारखंड टीमला विजय हजारे ट्रॉफीमध्ये पराभवाला सामोर जाव लागले.

Updated: Dec 24, 2015, 08:36 PM IST
धोनीची अपयशी झुंझार खेळी  title=

बंगळूरू :  महेंद्रसिंग धोनीनं 70 रन्सची तडाखेबंद इनिंग खेळल्यानंतरही त्याच्या झारखंड टीमला विजय हजारे ट्रॉफीमध्ये पराभवाला सामोर जाव लागले.

दिल्लीनं 99 रन्सनं झारखंडला धूळ चारली. दिल्लीनं झारखंडसमोर विजयासाठी 226 रन्सचं टार्गेट ठेवल होतं. पण झारखंडला हे टार्गेट गाठता आलं नाही.

दिल्लीचा मीडियम पेसर सुबोध भाटीने २१ धावा देऊन ४ विकेट घेतल्या तर नवदीप सैनी याने ३१ धावा देऊन ३ विकेट घेतल्या. ईशांतच्या हाती २ विकेट लागल्या. पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्लीने ५० षटकात २२५ धावांचे लक्ष ठेवले. पण झारखंडचा संघत ३८ ओव्हर्समध्ये केवळ १२६ धावाच करू शकले. यात धोनीने ७० धावांचे योगदान दिले. पण हा संघर्ष एक तर्फी होता. त्याने १०८ चेंडूंचा सामना केला. त्यात पाच चौकार आणि चार षटकार लगावले.