'धोनीला कर्णधार करण्याची सूचना सचिनची'

कर्णधार महेंद्रसिंग ढोणीला संघाचा कर्णधार बनवावे, अशी सूचना खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली होती, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. धोनी हा  भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यासह अनेक विक्रम करणारा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.

Updated: Dec 24, 2015, 06:48 PM IST
'धोनीला कर्णधार करण्याची सूचना सचिनची' title=

पुणे : कर्णधार महेंद्रसिंग ढोणीला संघाचा कर्णधार बनवावे, अशी सूचना खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली होती, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. धोनी हा  भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यासह अनेक विक्रम करणारा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलतांना पवारांनी ही माहिती दिली. क्रिकेटच्या मैदानावरच महेंद्रसिंग धोनीची सचिन, सेहवागसारख्या ज्येष्ठ खेळाडूंबद्दलची नाराजी हा चर्चेचा विषय होता. 

ज्येष्ठ खेळांडूना संघात घेण्याबद्दल ढोणी विशेष उत्सुक नसायचा. मात्र याच धोनीला भारताचा कर्णधार बनवण्यात यावे, अशी सूचना खुद्द सचिनने केली होती, असे पवार म्हणाले. 

एक गुणवान खेळाडू असलेल्या ढोणीने कर्णधारपद भूषणवताना भारताला अनेक सामने जिंकून दिले, त्याची कामगिरी मोलाची होतीच यात शंका नाही, पण त्याला कर्णधार बनवण्याची सचिनची सूचनाही तितकीच महत्वाची होती असेही पवार यांनी यावेळी सांगितलं.