एडीलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली टी-२० क्रिकेट मॅच झाली. यात भारताने चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाने ३७ रन्सने हा सामना जिंकला. मात्र, ५ कारणांमुळे चर्चा अधिक होतेय.
विराट कोहली यांने चांगला खेळ केल्याने त्याला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कमाल केली. युवराज सिंगला न पाठवता शेवटच्या तीन बॉलमध्ये ११ रन्स ठोकल्यात. त्याने चांगला स्कोअर करण्यास मोलाचा वाटा उचलला. असे असले तरी अशी पाच कारणे आहेत की हा सामना जिंकण्यासाठी महत्वाची ठरलीत. तोच चर्चेचा विषय झालाय.
१. जसप्रित बुमराह चौथा चांगला खेळाडू
टी-२० सामन्यात पर्दारपणात चांगले काम करणारा खेळाडू जसप्रित बुमराह ठरलाय. त्याने २३ रन्स देत ३ विकेट घेतल्या.
२. हार्दिक पांड्या
पहिल्यांदाच टी-२० सामना घेळताना हार्दिक पांड्याने आपली छाप पाडली. त्याने सलग दोन बॉलमध्ये २ विकेट घेतल्या आणि आपले महत्व दाखवून दिले.
३. फिरकी गोलंदाजांची कमाल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शेवटी फिरकी गोलंदाजांनी चकम दाखवून दिली. चार ओव्हरमध्ये जडेजाने २१ रन्स देत २ विकेट घेतल्या. तर आर अश्विनने २८ रन्स देत २ विकेट घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.
४. कोहलीने जबाबदारी घेतली खांद्यावर
टीम इंडियाचे पहिले दोन्ही खेळाडू झटपट आऊट झाल्याने विराट कोहलीने आपली जबाबदारी उचलली. सामन्याची सूत्रे आपल्याकडे घेत जबाबदारीने ९० रन्सची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला चांगल्या स्कोअर उभा करता आला.
५. जुन्या खेळाडूंना मिळाली नाही संधी
ऑस्ट्रेलियाचा शॉन टेटने ४ ओव्हरमध्ये बिना विकेट ४५ रन्स दिलेत. तर युवराज सिंगला बॅटींग करायला मिळाले नाही. त्यामुळे तो आपली छाप पाडू शकला नाही.