हार्दिक पांड्याने घेतल्या तीन चेंडूत तीन विकेट

 भारताचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या याने एक वेगळा विक्रम केला आहे. त्याने तीन चेंडूत तीन विकेट घेण्याची वेगळा कारनामा केला. 

Updated: Mar 1, 2016, 08:57 PM IST
हार्दिक पांड्याने घेतल्या तीन चेंडूत तीन विकेट title=

ढाका :  भारताचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या याने एक वेगळा विक्रम केला आहे. त्याने तीन चेंडूत तीन विकेट घेण्याची वेगळा कारनामा केला. 

हार्दिक पांड्याने आशिया कपमधील भारताच्या दुसऱ्या सामन्यात अखेरच्या दोन चेंडूत दोन पाकिस्तानी फलंदाजांना बाद केले होते.  पाकिस्तानचा डाव संपवत त्याने मोहम्मद सामी आणि मोहम्मद आमीर यांना बाद केले होते. 

त्यानंतर आज गोलंदाजी करताना त्याने पहिल्याच चेंडूत दिलशानला बाद केले. त्यामुळे त्याने अप्रत्यक्ष हॅटट्रिक घेतली आहे. पण ही क्रिकेटच्या नियमांप्रमाणे हॅटट्रिक मानली जात नाही.