सचिनने वाटेल तेवढं खेळावं - गांगुली

सचिनला जोपर्यंत खेळावेसे वाटते, तोपर्यंत त्याने खेळावे,असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 25, 2013, 10:57 AM IST

www.24taas.com, कोलकता
सचिनला जोपर्यंत खेळावेसे वाटते, तोपर्यंत त्याने खेळावे,असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले आहे. सचिनच्या निवृत्तीबाबत काळच उत्तर देईल. त्याला जो पर्यंत खेळावेसे वाटते तो पर्यंत त्याने खेळावे, ते दक्षिण आफ्रिका असो वा न्यूझीलंड किंवा इतर कुठेही त्याने खेळत राहावे, असे म्हणून सचिनच्या बाजूने सौरवने बॅटिंग केली आहे.
सचिनच्या फॉर्मबद्दल बोलताना सौरव म्हणाला, क्रिकेटमध्ये विजय हा सांघिक असतो. आपल्याला त्याने चेन्नईमध्ये केलेल्या ८१ धावा विसरून चालणार नाही. त्यावेळी भारत अडचणीत आला होता. भारताने झटपट दोन विकेट टाकल्या होत्या.

दिल्ली कसोटीत मॅन ऑफ द मॅचचा किताब हा चेतेश्वर पुजाराला मिळायला हवा होता. परंतु, ५८ रन देऊन पाच विकेट घेणाऱ्या रविंद्र जडेजाला देण्यात आल्याचे सौरवने नमूद केले. पुजाराने अत्यंत कठीण पीचवर १३४, ५२ आणि ८२ धावा काढल्या. त्यामुळे मॅन ऑफ द मॅच तो आहे.