राज-गडकरी भेटीवर उद्धव कमालीचे अस्वस्थ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या भेटीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कमालीचे अस्वस्थ झालेत.

Updated: Mar 3, 2014, 07:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या भेटीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कमालीचे अस्वस्थ झालेत.
एवढेच नव्हे तर नाराज उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात थेट भाजप पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडे तक्रार केल्याचे समजते.
कळत नकळत जे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मदत करतील, त्यांना जनताच धडा शिकवेल, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.
नाराजीवर नितिन गडकरींचे मत
दरम्यान, आपल्या भेटीमुळे कुणालाही नाराज होण्याचं कारण नाही, असं मत भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींनी व्यक्त केलंय.
राज ठाकरे यांना महायुतीमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असं सांगतानाच काँग्रेसविरोधी मतांची विभागणी टाळण्यासाठी राज ठाकरेंनी निवडणूक लढवू नये, असा सल्ला देखील गडकरींनी दिलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.