सोशलवर्कर `वंटास`

आज बंडूला लई वाईट वाटतं.... लेखणीवाले, शबनमची झोळी घेणारे, विसकटलेल्या केसांनी वावरणारे सोशलवर्कर ‘वंटास’ घेत आहेत. अन् राजकारणातल्या चिखलाच्या डबक्यात उड्यावर दुड्या मारताहेत.....

Updated: Feb 17, 2014, 08:14 PM IST

नमस्कार नेटकऱ्यांनो,
आज बंडूला लई वाईट वाटतं.... लेखणीवाले, शबनमची झोळी घेणारे, विसकटलेल्या केसांनी वावरणारे सोशलवर्कर ‘वंटास’ घेत आहेत. अन् राजकारणातल्या चिखलाच्या डबक्यात उड्यावर दुड्या मारताहेत.....
आपण बंडू, लोक आपल्याला बंड्या म्हणत असले, तरी स्वत: बद्दल आपल्याला लई रिस्पेक्ट.... आपल्याला आपल्या राज्य अन् देशाबद्दल पण तेवढाच रिस्पेक्ट.... आज लई कसंनुसं वाटतयं.... .
महाराष्ट्र देशा, दगडांच्या देशा आपण म्हणतो, पण आता या दगडावरचं टक्कूर आपटून घेण्याची पाळी आलीया... आपला महाराष्ट्र म्हणजे पहिल्यापासूनच समाजसेवकांची खाण एक सॉलीड खाण.... , आगरकर, प्रबोधनकार, बाबा आमटे, आणि आता अण्णा आजोबा असे ढासू समाजसेवक... गेल्या काही दिवसांपासून ‘मस्तीवाल’ मफलरवाल्याचे सोंग पाहून अण्णांबद्दलचा रिस्पेक्ट आपल्याला लई वाढलाय आता.
‘आप’ नावाचा ‘साप’ या सर्व समाजसेवकांना डसला... अन् त्यांच्यावर राजकारणाचं जहर असर करायला लागलं.... काय म्हणतात.... तुम्हांला पण पटलं ना.... आपण असे आहोत... लोकांच्या हार्टमधलं बोलतू....
आपल्या महाराष्ट्राच्या ताई, कधी त्यांनी डोक्याला तेल लावलं नाही. केसं व्यवस्थित इंचरायला वेळ दिला नाही.... महाराष्ट्र-गुजरात सीमेवर आदिवासी बांधवांसाठी असो किंवा मुंबईच्या झोपडपट्टीवाल्यांचा प्रोब्लेम असो त्यांनी बिनधास्त त्यात उडी घेतली.... पण आता या ताईंनी ‘कर’ जोडून राजकारणात प्रवेश केला अन् आपल्या भाऊबंदांकडे ‘पाट’ फिरवली....
महाराष्ट्रात आता वन...टू...थ्री... फोर असे बोटावर काउंटिंग इतके सोशल वर्कर बाकी हायेत....
मात्र या बाबतीत आपण सोशलवर्कर आजोबा अण्णांना मानतो, दिल्लीची राजकीय हवा बोले तो त्यांच्या डोक्यात कधीच गेली नाही. त्याचं पानिपत कधीच झालं नाही.
सोशलवर्कर अण्णा आजोबांपुढे `मस्तीवाल` सारखे भले भले वाहून गेले. त्यांनी सरळ सांगितलं, राजकारण.... नाही म्हणजे नाही.
आजही त्यांनी आपल्या जुन्या चेल्यांना पार बोलून सोलपटून टाकलंय. चेल्यांना देशापेक्षा सत्ता प्रिय असल्याचं अण्णा आजोबांनी सुनावलं आहे.
अण्णांना उत्तर द्यायची तशी त्या दिल्लीतल्या मफलरवाल्याची हिम्मत नाय..... उत्तर दिलं त्याचा टांगा पलटी घोडे फरार.....एकेकाळी ‘मातोश्री’वरूनही सोडून गेलेल्या लखोबा लोखंडे आणि इतरांना शाब्दिक फटकारे मारत होते....
मागील अनेक दिवसांपासून मीडियावाले, सोशलवर्कर, योगीबाबा आणि भोगीबाबांना देशातील राजकारण डोळा मारून खुणवत आहे.
म्हणून या बंड्याचा सल्ला आहे, एवढया दिवसापासून आपण या कट्टयावर बसतो, सांभाळा, कारण निवडणुका येतील जातील, सरकार पडेल, सरकारं स्थापन होतील, पण महाराष्ट्राला चांगल्या सोशलवर्करची गरज आहे. ते परत मिळणार नाहीत.
चला बंड्या आज फुल टू इमोशनल झालाय, बाय, भेटू कट्टयावरच
आपला
फंडू झेंडू ... बंड्या...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.