आधी गाणी शूट केली अन् नंतर स्क्रिप्ट शोधत बसले; गोविंदाच्या 'या' सुपरहिट चित्रपटाचा अजब रेकॉर्ड

Govinda Movie : गोविंदा आणि डेव्हिड धवन यांच्या 'या' चित्रपटातील गाणी आधी झाली शूट मग निघाले पटकथेच्या शोधात

दिक्षा पाटील | Updated: Jan 13, 2025, 05:00 PM IST
आधी गाणी शूट केली अन् नंतर स्क्रिप्ट शोधत बसले; गोविंदाच्या 'या' सुपरहिट चित्रपटाचा अजब रेकॉर्ड title=
(Photo Credit : Social Media)

Govinda Movie : चित्रपटसृष्टीत सगळ्या गोष्टी या पटकथा, कलाकारा आणि अभिनयावर अवलंबून असतात असं म्हणतात. त्यासोबत एक गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमचा टाइम कसा सुरु आहे. कारण ज्या अभिनेत्याचे किंवा दिग्दर्शकाचे एकामागे एक चित्रपट हे हिट जातात त्यांना एकामागे एक नवीन चित्रपटांची ऑफर मिळू लागते. त्याच्याविषयी सतत चर्चा सुरु असते. आज सगळ्यांना गाजलेल्या अभिनेत्याविषयी किंवा कलाकाराविषयी माहिती आहे. दरम्यान, त्यासोबत तुम्हाला 90 च्या दशकातील दिग्दर्शकांची नावं आठवणं काही कठीण आहे. 90 च्या दशकात डेव्हिड धवन यांची लोकप्रियता काही कमी नव्हती. डेव्हिड धवन जो चित्रपट करायचे तो चित्रपट ब्लॉकबस्टर व्हायचा. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसोबत काम करण्यासाठी सगळे उत्सुक होते. 

डेव्हिड धवन यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक लोक उत्साही असायचे. असं म्हटलं जातं की त्यांच्या चित्रपटाला होकार देण्याआधी तयारी सुरु करतात. अशात 2000 मध्ये प्रदर्शित झालेला 'कुंवारा' हा चित्रपट आहे. चित्रपटात गोविंदा आणि उर्मिला मातोंडकर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती आणि डेव्हिड धवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. पण तुम्हाला माहितीये का की हा चित्रपट 19 कोटी 34 लाख रुपयांमध्ये बनवण्यात आला. सगळ्यात लक्ष वेधी गोष्ट म्हणजे या चित्रपटाची पटकथा ही नंतर लिहिण्यात आली आणि त्याची चार गाणी ही आधीच दिग्दर्शित करण्यात आली होती. तर चला जाणून घेऊया असं काय झालं.

चित्रपटाची पटकथा लिहिणारा लेखक युनुस सेजेवालनं एका मुलाखती दरम्यान हा किस्सा सांगितला होता. युनुसनं सांगितलं की 'डेव्हिड जी यांचा तो काळ होता की प्रत्येकाला डेव्हिड दी यांच्यासोबत काम करायचं होतं. प्रत्येकाची इच्छा होती की डेव्हिड धनव यांनी त्यांचा चित्रपट दिग्दर्शित करावा. आधी दिग्दर्शकावर इतका विश्वास असायचा. मग गोविंदा सर आणि डेव्हिड जी यांचं कॉम्बिनेशन देखील तसंच होतं. आता त्यासाठी कोणती पटकथा नव्हती. तर त्यांनी परदेशात जाऊन 3 किंवा 4 गाणी शूट केली आणि मग इथे आल्यानंतर पटकथा काय असायला हवी याचा विचार करु लागले.'

हेही वाचा : 'पत्नीकडे पाहिलं नाही तर...', अनुपम मित्तलनं L&T च्या चेअरमनला दिलं सडेतोड उत्तर; वाचून अनेकांना हसू अनावर

लेखकानं पुढे सांगितलं की मग चिरंजीवी सरांचा एक दाक्षिणात्य चित्रपट होता. त्याचं ऑफिशियल रीमेक आम्ही लिहिलं आहे. पण हा एकमेव चित्रपट नाही. तर आम्ही चल मेरे भाईचं शूटिंग करत होतो. विश्वासावर सगळं व्हायचं. मग त्याच पद्धतीनं चित्रपट बनायचे. या दरम्यान, गोविंदा आणि डेव्हिड धनव यांच्या जोडीनं त्या दरम्यान ही अनेक हीट चित्रपट दिले आजही हे लोक मोकळ्या वेळात टीव्हीवर हे चित्रपट आनंदानं पाहतात.