राजकारणातले दोन `मफलर`

राज्य आणि देशात मागच्या आठ दिवसांपासून राजकीय वातावरण तापत होतं पण दोन मफलरांनी आपली मफरल काही सोडली नाही.

Updated: Feb 17, 2014, 08:32 AM IST

नेटवाल्यांनो नमस्कार.....
राज्य आणि देशात मागच्या आठ दिवसांपासून राजकीय वातावरण तापत होतं पण दोन मफलरांनी आपली मफरल काही सोडली नाही.
तसं वातावरण पाहिलं तर लई गार... व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने वातावरणातली ही गुलाबी थंडी बरी म्हणावी लागेल. पण वातावरणाप्रमाणे चालतील ते राजकारणी कुठं.... राजकारण तापत होतं आणि यांनी काय आपली मफरल सोडली नाय... आणि आपला हट्टही.

आधी राज्यात साहेबांचं टोल आंदोलन, त्यातही आलं एक मफलर, जसं राज्यात एक मफलर, तसं दिल्लीतही एक मफलर, पण या दिल्लीतल्या मफलरने तर देशाच्या राजकारणातच वादळ आणलंय.
आणखी एकदा जनतेत जायची तयारी, व्वा रे गडी...!.

एक मफलर आपलं `टोल` वालं, तर दुसरं दिल्लीतलं मफलर बघा, कसं टोलवतं एक एकाला...हं.
राज्यातलं आपलं `फॅशन`वालं आणि दिल्लीतलं थंडीचं मफलर यात हाच फरक.
राज्यातल्या मफलरनेही जनतेला बरोबर `टोल`वलंय बरं...!
हं...माहित्येय का तुम्हाला...नाही?
10 कोटीच्या आता खर्च असलेले जे टोल नाके बंद केले ना, त्यातील बरेचशे या आधीच बंद होते...हॅ...हे...हे...मफलर
हे टोल नाके बंद झाल्यानंतर, आता फक्त शेड उरले होते, ते काढून घेणार आहेत.
हे शेड काढून घेणे, हे त्या-त्या मीडियावाल्याचं यश आहे, जे नेहमीच म्हणतात, आम्ही केलं, आम्ही केलं.

जाऊ द्या खरं खोटं, यासाठी बंड्यानेच काय ते `डोळे उघडून पांढरे` करायचे.
मी बंड्या, साधा कार्यकर्ता, ज्या नेत्याची हवा तिकडे आपण, कारण आपल्याला माहित आहे, आज काल ज्याच्याकडे कार्यकर्त्यांचा अता न पता, तो पण म्हणतो, मीच नेता.
हे या बंड्याला माहित आहे, आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंतची खबर ठेवतो. कसंय, दिल्लीत आपलं पुन्हा पानीपत नको, बरोबर.
दिल्लीतला मफलरवाला तसा हट्टी दिसतोय, लहान मुलांसारखं गाडी नको, बंगला नको, हे नको, ते नको, आता सरकार नको.

दिल्लीतल्या मफलरला काय हवंय आणि काय नको, हे काँग्रेस आणि भाजपला नक्की ठाऊक असेल.
मफलरवाल्याने म्हणे सपाच्या नेताजींना भ्रष्टाचारी म्हणून लेबल लावलं, आणि त्यांनी सांगितलं दिल्लीला पाणी देणार नाही.
दिल्लीतला वीजेचा प्रश्नही तसा गंभीर, आता उन्हाळ्यात वीज आणि पाण्याचा प्रश्न घाम काढेल, दिल्ली केंद्रशासित असल्याने धोतराचा काष्टा केंद्राच्या हाती, त्या आधीच मफलरने व्यवस्थित घडी घालून, राजीनामा दिला आणि इभ्रत वाचवण्याचा प्रयत्न केला.
दिल्लीतल्या मफलरवाला हा काहणीप्रमाणे चित्रपट काढतो आहे. त्याला माहित आहे आता दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून लोकसभेला सामोरे जाण्यापेक्षा हुतात्मा होऊन लोकसभेला सामोरे जाणे फायद्याचे, नाही का..... त्यामुळे त्यानं टकूरं चालवलं अन दिला राजीनामा.... या फिल्मचं स्क्रिप्ट मफलरने लिहलं आहे.... अन् त्यानं कॅमेरा वापरले हे मीडियावाल्यांचे.... पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त....
या मफलरवाल्याने हाफ सेन्चुरी पण मारली नाही. ५० दिवसांच्या आत सरकार गुंडाळलं. मफलरवाल्याला लोकशाही पोरखेळ वाटतेय का? ४९ दिवसांची राजकारणात त्याने इंटर्नशीप केली. आता त्याचा लोकसभेच्या जागांवर डोळा आहे. हे बंड्याला माहित आहे ना...
नाही मला असे लई प्रश्न पडतात, आपण बंडू, चौकात ठाण मांडतो, सर्वांच्या अडीअडचणीला पुढे राहतो, आपन कॉमन मॅन, मग आपण यांना विचारणार नाही तर कोण विचारणार?
जाऊ द्या आपल्याला काय करायचंय आपल्याला दिसलं ते बोल्लू.... तर पुन्हा भेटू या बंड्याचा या कट्ट्यावर

आपला
फंडू झेंडू... बंड्या.... #Bandya

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.