दुष्काळ निवारणासाठी राज ठाकरे पुढे सरसावले....

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यांच्या ह्या दौऱ्यात त्यांनी राजकीय नेत्यांवर केलेल्या टीकांमुळे त्यांचा हा दौरा चांगलाच रंगतो आहे.

Updated: Mar 1, 2013, 03:30 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यांच्या ह्या दौऱ्यात त्यांनी राजकीय नेत्यांवर केलेल्या टीकांमुळे त्यांचा हा दौरा चांगलाच रंगतो आहे. मात्र महाराष्ट्रात पडालेला भीषण दुष्काळ याकडे कोणाचे लक्ष आहे की नाही, असाही प्रश्न विचारण्यात येतो आहे. मात्र याचवेळेस राज ठाकर यांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत करणार असल्याचेही जाहीर केले आहे.
औरंगाबादमध्ये सार्वजनिक, खासगी, पडिक, दुर्लक्षीत असलेल्या विहिरींची दुरुस्ती करून पाणी उपलब्ध करून औरंगाबादेतील दुष्काळाला मुळापासूनच काढून टाका.१५ दिवसांत विहिरींसाठी लागणाऱ्या दुरुस्तीचा खर्चाचा अहवाल पाठवा. तुमच्याकडून निधी उपलब्ध नाही झाला तर मी विहिरींच्या दुरुस्तीसाठी खर्च देतो, अशी ग्वाहीही राज ठाकरे यांनी गुरुवारी औरंगाबादेत दिली.

शहरातील अशा विहिरींच्या माध्यमातून येणाऱ्या काळात शहराला पाणी उपलब्ध करून देऊ शकतो, "विहिरींची साफसफाई आणि काही ठिकाणी खोली वाढविण्याची गरज आहे. यासाठी एका विहिरीला किमान दोन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही संकल्पना आवडल्यानंतर राज ठाकरे यांनी तातडीने शहरातील विहिरींचा अहवाल तयार करून, विहिरी दुरुस्तीसाठी किती खर्च येईल, तुम्ही किती खर्च करू शकता, याची सविस्तर माहिती 15 दिवसांनी सादर करण्याचे सांगितले. या उपक्रमासाठी मी निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाहीही दिली आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या ह्या दौऱ्यात महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा दौरा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.