लोकमान्य टिळकांचा 'तो' आवाज होता खोटा?

`स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच...` हे वाक्य उचारणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या आवाजाची ध्वनीमुद्रिका मिळाली असल्याची काही दिवसापूर्वी स्पष्ट करण्यात आलं होतं.

Updated: Oct 13, 2012, 01:30 PM IST

www.24taas.com, पुणे
`स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच...` हे वाक्य उचारणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या आवाजाची ध्वनीमुद्रिका मिळाली असल्याची काही दिवसापूर्वी स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र आता ती ध्वनीमुद्रिका खोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्याच्या गणेशोत्सवात ९2 वर्षांपूर्वी घुमलेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आवाज सापडल्याचा दावा त्यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी केला होता. मात्र, हा दावा शास्त्रीय कसोट्यांवर न टिकणारा आणि पूर्ण असत्य आहे. केसरीवाड्यात 24 ऑगस्टला ऐकवण्यात आलेला हा आवाज तिस-याच कुणाचा तरी आहे, असे संशोधन सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्सने मांडले आहे.
सोसायटीचे अध्यक्ष मकरंद केळकर आणि अ‍ॅड. राजन ठाकूरदेसाई यांनी ही माहिती दिली. लोकमान्यांचा आवाज ऐतिहासिक दस्तऐवज असून याबाबतीत देशाची दिशाभूल होणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.