www.24taas.com, ऱत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात कुपोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गेल्या 9 महिन्यांत तब्बल 152 बालकं कुपोषणानं दगावल्याचं समोर आलंय.
तसंच पुरेसा पोषक आहार न मिळाल्यानं 6 गरोदर मातांचा मृत्यू झालाय. कोकणामध्ये कुपोषण नाही, असा डांगोरा पिटणा-या अधिका-यांची यामुळे झोप उडालीये. कुपोषण निर्मुलन आणि गरोदर मातांच्या संगोपनासाठी आरोग्य खात्याकडून 16 कोटी रुपये मंजूर झालेत.
यातले 9 कोटी रुपये गेल्या 9 महिन्यांत खर्चही झालेत. असं असूनही कोकणात इतक्या मोठ्या प्रमाणावर कुपोषणाचे बळी का गेले, हा निधी नेमका कुठे गेला, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत...आरोग्य अधिकारी मात्र हे प्रमाण कमी असल्याचा दावा करतायेत.