कलमाडी पुन्हा एशियन अॅथलेटिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी?

कॉमन वेल्थ स्पर्धांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप असताना सुरेश कलमाडी पुन्हा एकदा एशियन अॅथलेटिक असोसिएशन च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 30, 2013, 07:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
कॉमन वेल्थ स्पर्धांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप असताना सुरेश कलमाडी पुन्हा एकदा एशियन अॅथलेटिक असोसिएशन च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेत.
तीन वेळा अध्यक्ष पद भूषवलेल्या कलमाडी यांनी चौथ्यांदा हे पद मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी केलीय. या निवडणुकीमध्ये कलमाडी यांचा सामना क़तारच्या अल हमाद यांच्याशी होणार आहे. अल हमाद हे अशियन अॅथलेटिक असोसिएशन चे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असताना ही निवडणूक कशी लढता येणार अस विचारलं असता, कलमाडी यांच्यावर फ़क़्त आरोप झालेत ते सिद्ध झाले नसल्याचं, अशियन अॅथलेटिक असोसिएशनचे सचिव मॉरीस निकोलस यांनी सांगितलं.
कलमाडी संघटनेचे सदस्य आहेत आणि जर त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले तर आपोआपच कारवाई होईल अस स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.