भूपती-बोपन्नाला हायकोर्टाचा दिलासा

टेनिसपटू महेश भूपती आणि रोहन बोपन्ना यांच्यावरील बंदीला कर्नाटका हायकोर्टानं स्थगिती दिलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 22, 2012, 08:03 PM IST

www.24taas.com, बंगळुरू
टेनिसपटू महेश भूपती आणि रोहन बोपन्ना यांच्यावरील बंदीला कर्नाटका हायकोर्टानं स्थगिती दिलीय. ऑल इंडिया टेनिस एसोसिएशनने भूपती-बोपन्नावर दोन वर्षांची बंदी घातली होती. या निर्णयाविरूद्ध भूपति-बोपन्नाने कोर्टात धाव घेतली होती. यावर कर्नाटक हायकोर्टानं हा निर्णय दिलाय.
कोर्टाने भारतीय टेनिस संघाला (AITA) याप्रकरणी नोटीस पाठवून बंदीच्या निर्णयाबाबत उत्तर देण्यास सांगितलय. टेनिस संघानं भूपति आणि बोपन्ना यांच्यावर कारवाई करत ३० जून २०१४ पर्यंत खेळण्यास बंदी घातली होती. युवा प्लेअर्सना प्राधान्य देण्यासाठी टेनिस संघानं हा निर्णय घेतल्याचं सांगितल होतं. परंतू हा निर्णय घेताना टेनिस संघानं संबंधित खेळाडूंशी चर्चा मात्र टाळली. मात्र, लंडन ऑलिम्पिकमध्ये पेसबरोबर खेळण्यास नकार दिल्यामुळेच भूपति आणि बोपन्नावर ही बंदी घातल्याचं बोलल जातंय.