www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
दीड वर्ष पूर्वी नाशिक महापालिकेवरून शिवसेनेचा भगवा खाली उतरला. दीड वर्षात शहरातील रस्ते गुळगुळीत होतील अस वाटलं होतं, पण सगळ्या शहरात खड्डे पडले आहेत आणि ज्यांची सत्ता आहे तेच आपली जबाबदारी झटकत आहेत. अशा शब्दात उद्धव यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केली.
तर दुसरी कडे नव्याने झालेल्या उड्डाण पुलावरही खड्डे पडले आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तेच आता उजळ मथ्याने तुमच्याकडे मत मागण्यासाठी येणार आहेत. भुजबळ यांचा निवडणुकीत पराभव करा, त्यांचं डिपॉझिट जप्त करा. नाशिक शहरावर शिवसेनाप्रमुखांचं प्रेम होतं, त्यामुळे नाशिकवरचा उतरलेला भगवा पुन्हा फडकवा अस भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी बुथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केलं.
मंडळ आयोगाला विरोध करून शिवसेना सोडणारे भुजबळ ओबीसीचं राजकारण करत आहेत आणि शरद पवार आर्थिक दुर्बल घटकाच्या आधारावर आरक्षणाची मागणी करत आहेत. दोघांची भूमिका विरोधी असल्याने भुजबळ आता राष्ट्रवादी मधून बाहेर पडतील का असा सवाल उद्धव यांनी केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.