नागपूरच्या वाघोबाची खास बडदास्त

सध्या लोकसभा निवडणूकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यातच आता वैशाख वणव्यामुळे नागपूरचा पाराही 42 अंशांवर गेलाय.

Updated: Apr 27, 2014, 09:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
सध्या लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यातच आता वैशाख वणव्यामुळे नागपूरचा पाराही 42 अंशांवर गेलाय.
या वाढत्या तपमानापासून मुक्या जीवांचं रक्षण करण्यासाठी महाराजा प्राणी संग्रहालयातील कर्मचा-यांची धावपळ सुरू आहे.
दोन दोन कुलरच्या थंडगार हवेची मजा घेणारे हे वाघोबा महाशय, यांची ही खास बडदास्त पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्राहालयातील सर्वच प्राण्यांची अशीच खास सोय करण्यात आली आहे, याला कारणही तसंच आहे.
नागपुरात वैशाख वणव्याची झळ आता बसू लागलीय. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही हो लागली आहे. याचा सर्वाधीक फटका या मुक्या जनावरांना बसतो. त्यामुळे कुलर, ग्रीन नेट, पाण्याच्या फवाराच्या उपयोग करून प्राण्यांचे तापमान नियंत्रित करण्यात येतं.
प्राण्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी इथे एकीकडे चोवीस तास कुलर असतो तर दुसरीकडे दिवसातून तीन वेळा पाण्याचा फवारा मारला जाते.
या शिवाय प्राण्यांच्या आहाराकडेही विशेष लक्ष दिलं जातं. सनस्ट्रोकचा त्रास होऊ नये, म्हणून या प्राण्यांना वेळोवेळी आवश्यक ती औषधंही देण्यात येतात.
उन्हापासून रक्षण व्हावं म्हणून प्राणी संग्रहालय प्रशासनाने येथील मुक्याजीवांसाठी केलेली ही उपाय योजना खरच कौतुकास्पदच म्हणावी लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.