गावगुंडांना वैतागून महिलांचा रात्री पोलीस चौकीतच मुक्काम

यवतमाळच्या पारवा गावातल्या महिलांनी वडगाव रोड पोलीस चौकीमध्ये रात्रभर मुक्काम ठोकला आणि गावगुंडाकडून वाचवण्याची पोलिसांना गळ घातली. गेल्या वर्षभारापासून महिलांना गावगुंडांच्या छेडछाडीचा सामना करावा लागतोय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 19, 2012, 07:33 PM IST

www.24taas.com, यवतमाळ
यवतमाळच्या पारवा गावातल्या महिलांनी वडगाव रोड पोलीस चौकीमध्ये रात्रभर मुक्काम ठोकला आणि गावगुंडाकडून वाचवण्याची पोलिसांना गळ घातली. गेल्या वर्षभारापासून महिलांना गावगुंडांच्या छेडछाडीचा सामना करावा लागतोय.
त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी एसपींना यासंदर्भात महिलांनी निवेदन दिलं होतं याचा राग मनात ठेवून गुंडानी मंगळवारी पुन्हा महिलांना शस्त्राचा धाक दाखवून धमकावल्यानं महिला रात्रभर पोलीस ठाण्यातच थांबल्या. मुन्ना ठाकूर, सुनील देवतले आणि गब्बर कोडापे अशी त्यांची नावं आहेत.त्यांच्याबाबत वारंवार तक्रारी करुनदेखील पोलीस कारवाई करत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
चाकू, तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवणे, शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींना त्रास देणे, त्यांची छेड काढणे, अश्लील वर्तणूक करणे, काम करणार्याु महिलांचे पैसे लुटणे, मुलींवर बलात्काराची धमकी देणे, घरात घुसून मारपीट करणे असा धुमाकुळ या गावगुंडांचा रोजचाच...त्यांनी गावात प्रचंड दहशत निर्माण केली आहे. दरम्यान महिला रात्रीच मोर्चा घेऊन पोलीस ठाण्यावर धडकल्याने पोलिसांनी दोन गुंडांना अटक केली.