मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्मान सेना युती व्हावी यासाठी राज आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंदूमामा वैद्य यांनी प्रयत्न सुरू केलेत.
गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या मातोश्री आणि कृष्णकुंजवर चकरा सुरू आहेत. शिवसेना-मनसे एकत्र आल्यास कल्याण-डोंबिवलीचे सत्ता समीकरण चुटकीसरशी सुटणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश येतं का, याकडे लक्ष लागलंय.
मात्र, याबाबत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास चंदूमामांनी नकार दिलाय. त्यांनी झी मीडियाशी बोलताना व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया. साहेब गेल्यानंतर मी प्रतिज्ञा केली होती. माझी ही प्रतिज्ञा तुळजापूर भवानी मातेच्या कृपेने पूर्ण होण्याची शक्यता आहे. आजचा सामना वाचल्यानंतर मझी सकारात्मक आशा निर्माण झालेय. ही चांगली गोष्ट आहे. झाले गेले विसरुन जावे, का दूरावा झाला याची चर्चा करण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी एकत्र, यावे ही अपेक्षा आहे. त्यादृष्टीने मी प्रयत्न करणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.