पान मसाला जाहिरात : शाहरुख, अजय देवगण, गोविंदाला नोटीस

बंदी असताना पान मसाल्याची जाहिरात करणे बॉलिवूडच्या कलाकारांना भोवण्याची शक्यता आहे. पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी या कलाकारांना एफडीए नोटीसा पाठवणार आहे.

Updated: Nov 4, 2015, 03:30 PM IST
पान मसाला जाहिरात : शाहरुख, अजय देवगण, गोविंदाला नोटीस  title=

मुंबई : बंदी असताना पान मसाल्याची जाहिरात करणे बॉलिवूडच्या कलाकारांना भोवण्याची शक्यता आहे. पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी या कलाकारांना एफडीए नोटीसा पाठवणार आहे.

राज्यात पान मसाल्यावर बंदी असतानाही जाहिरात करण्यात येत आहे. संबंधित कंपनी आणि कलाकारांवर नियमानुसार कारवाई करणार असल्याची माहिती एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिलीय. त्यामुळे शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी हे अडचणीत सापडलेत.

या अभिनेत्यांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे यापुढे बंदी असणाऱ्या कोणत्याही उत्पादनाबाबत कलाकारांना आता काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, मॅगीवर बंदी घालण्यात आल्यानंतर माधुरी, प्रिती झिंटा आणि बिब बी अमिताभ यांनाही नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, मॅगीवरील बंदी उठल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.