मुंबई : मुंबईत नाईटलाईफ सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना, हायकोर्टानं याबाबत कडक ताशेरे ओढलेत.
महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार ज्या उपाययोजना करणार आहे, त्याबाबत समाधान होत नाही तोपर्यंत नाईटलाईफला परवानगी देता येणार नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलंय.
नाईट लाईफ सुरू करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे पुरेसं मनुष्यबळ आहे का? अशी विचारणाही कोर्टानं केलीय.
डान्स बार बंदी आणि उशिरापर्यंत बार आणि हॉटेल्स सुरू न ठेवण्याच्या नियमांमुळे महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये घट झालीय, याकडं कोर्टानं सरकारचं लक्ष वेधलं.
नाईट लाईफ दरम्यान सुरक्षेचा आढावा घेतलाय का? नाईट लाईफ दरम्यान महिलांच्या सुरक्षेची हमी काय ? अशी विचारणा करत, येत्या १० एप्रिलपर्यंत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.