मुंबई : माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या मंत्रीपदाच्या स्वप्नांना मोठा झटका बसला आहे. २००४ ते २००९ या काळात गावित मंत्रीपदी असतना आदिवासी विकास विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका गावितांवर ठेवण्यात आला आहे.
भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या गायकवाड समितीनं आपला अहवाल कोर्टात सादर केला आहे. त्यातून ही माहिती पुढे आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी विजयकुमार गावित राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले. त्यावेळीही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होतेच पण आता चौकशी समितीच्या अहवालात तथ्य सापडल्यानं गावितांच्या अडचणी वाढल्या आहेत.