व्हिडिओ: गतिमंद विद्यार्थ्याला शिक्षिकेची अमानुष मारहाण

माटुंग्याच्या शाळेत गतिमंद विद्यार्थ्याला शिक्षकांकडून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय. शाळेजवळील रहिवाशांनी या मारहाणीचं चित्रीकरण केल्यांनं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

Updated: Aug 7, 2014, 02:38 PM IST
व्हिडिओ: गतिमंद विद्यार्थ्याला शिक्षिकेची अमानुष मारहाण title=

मुंबई: माटुंग्याच्या शाळेत गतिमंद विद्यार्थ्याला शिक्षकांकडून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय. शाळेजवळील रहिवाशांनी या मारहाणीचं चित्रीकरण केल्यांनं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

शाळेतील एका आठ वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षिका पट्टीनं मारहाण करत होती. ही शिक्षिका ज्यावेळी मुलाला मारहाण करत होती त्यावेळी शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं ही मारहाण मोबाईलमध्ये चित्रीत केली. यामध्ये शिक्षिका गतीमंद मुलाला मारत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.
 
मारहाणीची ही दृश्य समोर येताच पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी बाल हक्क समितीत तक्रार करण्याचा सल्ला पालकांना दिला. दरम्यान या शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडिओ 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.