सेनेच्या 'त्या' सहा पठ्ठ्यांना उद्धव ठाकरेंकडून शाब्बासकी!

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी सुधींद्र कुलकर्णी यांच्या चेहऱ्याला शाई फासणाऱ्या शिवसेनेच्या 'त्या' सहा कार्यकर्त्यांच्या सेना नेतृत्वाकडून शाब्बासकी मिळालीय.

Updated: Oct 13, 2015, 06:23 PM IST
सेनेच्या 'त्या' सहा पठ्ठ्यांना उद्धव ठाकरेंकडून शाब्बासकी! title=

मुंबई : पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी सुधींद्र कुलकर्णी यांच्या चेहऱ्याला शाई फासणाऱ्या शिवसेनेच्या 'त्या' सहा कार्यकर्त्यांच्या सेना नेतृत्वाकडून शाब्बासकी मिळालीय.

अधिक वाचा - शाई हल्ला : शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना अटक, जामीन

मंगळवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या या सहा कार्यकर्त्यांना मातोश्रीवर बोलावत त्यांचा सन्मान केल्याचं समजतंय. 

अधिक वाचा - शिवसेनेचं आंदोलन कायम, अफवांवर विश्वास ठेऊन नका - राऊत

शिवसेनेचे शाखाप्रमुख गजानन पाटील आणि पाच कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी ऑब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशन (ओआरएफ)चे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावर शाई फासली होती. यानंतर शिवसेनेवर चहूबाजुंनी टीका होतेय. 

अधिक वाचा - शिवसैनिकांनी शाई फेकली, सुधींद्र कुलकर्णींचा आरोप

या घटनेनंतर शिवसेनेच्या या सहा कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या कलमांखाली अटक करण्यात आली होती. परंतु, त्यांना लगेचच जामीनावर सोडून देण्यात आलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.